California Wild Fire: आलिशान बंगले, फिल्म स्टुडिओ अन् घरे आगीत जळून खाक...हॉलिवूडचे स्टार्स बेघर, पाहा मन हेलावणारे फोटो
अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील अनेक जंगलांमध्ये मोठी आग पसरली आहे. या वणव्यामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे. वाढत्या प्रमाणात ही आग (California Wild Fire) हॉलीवूडच्या हिल्सपर्यंत पोहोचली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया नव्या आगीमुळे शहरातील मोठा परिसर धोक्यात आला आहे. अग्निशमन दल आधीच शहराच्या इतिहासातील सर्वात भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
लॉस एंजेलिस अग्निशमन दलाला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने आग विझवावी लागत आहे. तरीदेखील अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. लॉस एंजेलिसमधील हॉलीवूडच्या हिल्सपर्यंत सर्वत्र जंगलातील आगीचा दाट धूर पसरल्याचं चित्र दिसून येत आहे.
जगातील अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसचे स्टुडिओ हॉलीवूड हिल्सवर आहेत. वॉर्नर ब्रदर्स, युनिव्हर्सल पिक्चर्स, पॅरामाउंट पिक्चर्स, वॉल्ट डिस्ने पिक्चर्स यांच्या अनेक चित्रपटांचे शूटिंग येथे सुरू आहे. याशिवाय अनेक हॉलिवूड स्टार्सही या ठिकाणी राहतात. आग लागल्यानंतर, अनेक कलाकारांनी त्यांची घरे सोडली असून स्थलांतर केले आहे.
25 हजार एकरपेक्षा जास्त जमीन जळून खाक झाली आहे.1 लाखांहून अधिक लोकांनी आपली घरे सोडली आहेत. लाखो लोकांना वीजपुरवठा खंडित होत आहे. लोक पश्चिम हॉलीवूड आणि बेव्हरली हिल्समधून पश्चिमेकडील सनसेट बुलेवर्डच्या दिशेने देखील गेले आहेत.