Urfi Javed: उर्फी जावेदच्या आईने घातले लेकीपेक्षा चांगले कपडे, आजीच्या साधेपणाने तर सर्वच चकित
उर्फी जावेद तिच्या कुटुंबासोबत डिनरला जाताना स्पॉट झाली. यावेळी तिच्या आईने उर्फीपेक्षाही चांगले कपडे घातले होते. उर्फीच्या आजीचा साधेपणाही दिसून येत होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउर्फी जावेद काही दिवसांपूर्वी आपल्या बहिणीसोबत डिनर एन्जॉय करताना दिसली होती. यावेळी उर्फी तिच्या आजी आणि आईसह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत रेस्टॉरंटच्या बाहेर दिसली.
नेहमी आपल्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद तिच्या फॅमिलीमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर नेहमी झळकणारी उर्फी कितीही स्टायलिश दिसत असली तिच्या कुटुंबातील प्रत्येकजण मात्र फार साधे आहेत.
उर्फी यावेळी पांढऱ्या कपड्यात दिसली. फॅमिली डिनरसाठी तिने टी-शर्ट ड्रेस निवडला होता, ज्यावर डाय प्रिंट दिसत होती.
यावेळी उर्फीचे कपडे नव्हे तर तिचे हेडपीस सर्वाधिक लक्ष वेधून घेत होता. मॉडेलने टोपी किंवा टोपीसारखे समजण्यास कठीण असे काहीतरी परिधान केले होते.
फॅमिली डिनर दरम्यान उर्फीच्या आईने सर्वांचं लक्ष वेधलं. तिचा साधा पण स्टायलिश लूक लोकांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरला.
कुटुंबातील सर्व सदस्य स्टायलिश कपड्यांमध्ये सजलेले असताना, उर्फीच्या आजीच्या फुलांचा कुर्ता-पायजमा सेटने मन जिंकले, हा साधेपणा नाकारणे अशक्य होते.
उर्फीची आई याआधीही मीडियासमोर आली होती, त्यावेळीही तिचा साधा लूक भारावून टाकणारा होता.