Madhuri Dixit Birthday: वयाच्या 3ऱ्या वर्षी नृत्य शिकली, शाळेतचं मिळाला पहिला चित्रपट; अशी होती धक धक गर्लची फिल्मी कारकीर्द!
माधुरी दीक्षित आज 15 मे 2024 रोजी तिचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाधुरीचा जन्म १५ मे १९६७ रोजी एका मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला. माधुरी दीक्षितला दोन मोठ्या बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे.
माधुरीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती, त्यामुळे तिने वयाच्या अवघ्या 3 व्या वर्षी प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली.
माधुरी दीक्षितने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये पहिला चित्रपट मिळाल्याची कहाणी सांगितली आहे.
माधुरीच्या म्हणण्यानुसार, ती तिच्या 12वीच्या सुट्ट्यांमध्ये विचार करत होती की, नवीन काय करावे. त्यानंतर राजश्री प्रॉडक्शन त्यांच्या अबोध चित्रपटासाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. त्यावेळी माधुरी दीक्षित शाळेत खेळायची आणि नाचायची. माधुरीची बहीण राजश्रीशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या मुलीची मैत्रीण होती. या प्रकरणात ती व्यक्ती माधुरीलाही ओळखत होती. त्यामुळे तो चित्रपटाची ऑफर घेऊन माधुरीच्या घरी पोहोचला.
माधुरीच्या कुटुंबीयांनी चित्रपटाची ऑफर साफ नाकारली होती.
राजश्री प्रॉडक्शनच्या ऑफिसमध्ये माधुरीला काही हिंदी ओळी वाचायला लावल्या. यानंतर माधुरीला थेट स्क्रीन टेस्टसाठी बोलावण्यात आले.
स्क्रीन टेस्टनंतर माधुरीला अबोधसाठी फायनल करण्यात आलं.
मात्र, माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट काही विशेष करू शकला नाही.
पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर माधुरीने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली.
माधुरीला अभिनयाची चटक लागली आणि त्यानंतर तिने 3-4 चित्रपटांमध्ये काम केले, पण तेही बॉक्स ऑफिसवर फारसे चालले नाहीत.
पदार्पणानंतर अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर सुभाष घई यांनी माधुरी दीक्षितला नवीन संधी दिली. सुभाष घई यांनी माधुरी दीक्षितला पुन्हा लॉन्च केले आणि त्यानंतर धक धक गर्लच्या अभिनयाला एक ट्रॅक मिळाला.
माधुरी दीक्षित सध्या टीव्ही रिॲलिटी शो डान्स दिवानेमध्ये दिसत आहे.(pc:madhuridixitnene/ig)