Kriti Sanon : अभिनेत्री कृती सेनेनला UAE ने दिलेल्या 'गोल्डन व्हिजा'चे फायदे काय?

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon)हिला UAE ने गोल्डन व्हिजा (Golden Visa) दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यापूर्वीही बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना हा व्हिजा मिळाला होता.

या यादीत आता कृती सेननचाही समावेश झाला आहे.
ECH डिजीटलचे सीईओ इकबाल मार्कोनी यांच्याकडून कृतीला हा गोल्डन व्हिजा देण्यात आलाय.
अभिनेत्री कृती सेननने हा व्हिजा मिळाल्यानंतर आभार मानले आहेत.
कृती म्हणाली, युएईचा गोल्डन व्हिजा मिळणे, ही सन्मानाची बाब आहे.
माझ्यासाठी दुबई फार खास आहे. मी दुबईच्या संस्कृतीचा हिस्सा बनण्यासाठी उत्सुक आहे.
अभिनेत्री कृती सेसनला मिळालेल्या गोल्डन व्हिजाचे अनेक फायदे आहेत.
हा व्हिजा मिळाल्यानंतर 10 वर्षे युएईमध्ये वास्तव्य करण्याचा मार्ग मोकळा होतो.
गोल्डन व्हिजा धारक मंडळी कोणत्याही कंपनीच्या, स्थानिकांच्या सहाकार्याशिवाय देशात राहू शकतात.