Satyaprem Ki Katha: Satyaprem Ki Katha या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कार्तिक-कियाराचा रोमँटिक अंदाज, पाहा कियाराचा ग्लॅमरस लुक
नुकतचं मुंबईच्या मल्टीप्लेक्समध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी आपल्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी पोहोचले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयादरम्यान दोघांनीही सिनेमाच्या अॅडवान्स बुकिंग विंडोचं उद्धाटन केलं. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
या फोटोत कार्तिक आणि कियारा एकमेकांसोबत रोमँटिक अंदाजात दिसत होते.
सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये कियारा अडवाणी ग्रीन आऊटफिट ड्रेस परिधान करून आली होती.या ड्रेसमध्ये कियारा खूपचं सुंदर दिसत होती.
मोकळे केस,ग्लॉसी मेकअप आणि हाय हिल्स सँडल यामुळे कियारा एकदम परफेक्ट लूकमध्ये दिसून येत होती.
याच वेळी देशातील तरूणीईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू कार्तिक देखील कियारासोबत लूकबाबत स्पर्धा करताना दिसत आहे. यावेळी त्याने आर्मी ग्रीन कलरचा शर्ट घातला होता.
लवकरच कार्तिक आणि कियारा यांचा 'सत्यप्रेम की कथा' सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
येत्या 29 जून रोजी 'सत्यप्रेम की कथा' सर्व सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना दोघांची पुन्हा एकदा रोमँटिक केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे