Rajarshi Shahu Maharaj: शाहू महाराजांचे स्मरण करुन देणाऱ्या समता दिंडीला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय! या जयघोषाने शाहू महाराजांचे स्मरण करुन देणाऱ्या समता दिंडीला कोल्हापूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.
जिल्हा प्रशासन व सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाच्या वतीने दसरा चौकात समता दिंडीसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
समता दिंडीचे उद्घाटन शाहू महाराज छत्रपती व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करून करण्यात आले.
दसरा चौकात सुरुवात झालेली समता दिंडी पुढे व्हीनस कॉर्नर-आई साहेबांचा पुतळा-बिंदू चौकात येवून या दिंडीचा समारोप झाला.
या समता दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ, झांज, ढोल ताशा, लेझीम आदी कलाप्रकार सादर केले.
दिंडीत एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईडचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शाहू महाराजांच्या वेशभूषेत उपस्थित मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जिल्हा समाजकल्याण कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या चित्ररथामध्ये पारंपरिक वेषभुषा परिधान करुन जिवंत देखावा सादर करण्यात आला.
शाहिरी पोवाड्यातून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध शाळांचे शेकडो विद्यार्थी, शाहू प्रेमी, इतिहास प्रेमी नागरिक उपस्थित होते.