Khatron Ke Khiladi : सिद्धार्थ कपूर, करिष्मा तन्ना ते पुनित पाठकपर्यंत, जिगरबाज स्टंट करत हे स्टार बनले 'खतरों के खिलाडी'
रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) शो 'खतरों के खिलाडी 11' (Khatron Ke Khiladi)चा ग्रॅंड फिनाले आज पार पडत आहे. आज रात्री कलर्स चॅनलवर विजेत्याची घोषणा होईल. जाणून घेऊयात आतापर्यंत कुणी कुणी खतरो के खिलाडी शो जिंकला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशांतनु माहेश्वरीनं हिना खान आणि रवि दुबेला मात देत 'खतरों के खिलाडी 8' ची ट्रॉफी जिंकली होती.
आशीष चौधरीनं 'खतरों के खिलाडी 6' च्या फायनलमध्ये मेयांग चांगला नमवत शो जिंकला होता. या पर्वाचं शूटिंग दक्षिण आफ्रिकेत झालं होतं.
दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला 'खतरों के खिलाडी 7' चा विजेता बनला होता. हा सिझन अभिनेता अर्जुन कपूरनं होस्ट केला होता.
'खतरों के खिलाडी 9' चा विजेता होता पुनीत पाठक. फायनलमध्ये त्याच्यासोबत होते आदित्य नारायण आणि रिधिमा पंडित.
रजनीश दुग्गलनं गुरमीत चौधरी आणि निकितिन धीरला नमवत 'खतरों के खिलाडी 5' ची ट्रॉफी जिंकली होती. यावेळी फायनलला अजय देवगण उपस्थित होता.
टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्नानं 'खतरों के खिलाडी 10' ची ट्रॉफी जिंकली होती. तिनं फायनलमध्ये करण पटेल आणि धर्मेश येलांडेला हरवलं होतं.