Daughters Day : Amrita Singh पासून Karisma Kapoor पर्यंत, बॉलिवूडच्या Single Mothers
Karisma Kapoor-Samaira Kapoor : करिश्मा कपूरनं 2003 मध्ये व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केलं होतं. करिश्मानं 2005 मध्ये आपली मुलही समायराला जन्म दिला. दरम्यान, करिश्मा 2014 मध्ये करिश्मानं पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता ती आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ करतेय. करिश्मा नेहमीच आपल्या मुलीसोबत दिसून येते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShweta Tiwari-Palak Tiwari : श्वेतानं 2000 मध्ये आपली मुलगी पलकला जन्म दिला. आपला पहिला पती राजा चौधरीशी विभक्त होताना आपल्या मुलीची कस्टडी स्वतःकडे घेतली. आज पलक आणि श्वेता नेहमीच एकत्र दिसून येतात.
Amrita Singh-Sara Ali Khan : अमृता सिंहनं सारा अली खानला 1995 मध्ये आणि इब्राहिमला 2001 मध्ये जन्म दिला. 2004 मध्ये अमृता आणि सैफ अली खान यांचा घटस्फोट झाला. अमृताला दोन्ही मुलांची कस्टडी मिळाली. अमृता आणि सारा अली खान नेहमीच एकत्र दिसून येतात.
Neena Gupta-Masaba : नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबानं 1989 मध्ये जन्म घेतला. नीना यांनी समाजाचा विचार न करता मसाबाचा एकट्यानं सांभाळ केला. दोघीही एकमेकींसोबत नेहमीच दिसून येतात.
Pooja Bedi-Alaya Furniturewala : कबीर बेदी यांची मुलगी आणि बॉलिवूडची अभिनेत्री पूजा बेदीचं लग्न फरहान इब्राहिमसोबत झालं होतं. दहा वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांना एक मुलगी अलाया आणि एक मुलगा उमर आहे. घटस्फोटानंतर पूजानं आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्विकारली.