Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ginni Chatrath Birthday : पत्नी गिन्नीच्या वाढदिवशी कपिल शर्मा झाला रोमँटिक; खास नोट लिहून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कॉमेडियन कपिल शर्माने त्याची पत्नी गिन्नी चतरथच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकॉमेडियन कपिल शर्मा अनेकदा अभिनेत्रींसोबत मस्करी करताना दिसत असेल, पण प्रत्यक्षात तो त्याची पत्नी गिन्नी चतरथवर खूप प्रेम करतो.
आज म्हणजेच 18 नोव्हेंबर 2022 रोजी गिन्नीचा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी कपिलने एक पोस्ट शेअर केली आहे.
कपिल शर्माने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पत्नी गिन्नी चतरथसोबतचे अनेक रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
हे फोटो शेअर करताना कपिल शर्माने पत्नीसाठी एक खास नोटही लिहिली आहे. त्याने लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय गिन्नी. माझ्या आयुष्यात सुंदर रंग भरल्याबद्दल धन्यवाद. देव तुला या विश्वातील सर्व प्रेम आणि आनंद देवो.
एका फोटोमध्ये गिन्नी वाईन एन्जॉय करताना दिसत आहे.
कपिल शर्मा आणि गिन्नीची प्रेमकहाणीही खूप गोड आहे. कपिल आणि गिन्नी एकाच कॉलेजमध्ये होते आणि एकत्र थिएटर करायचे. गिन्नी कपिलच्या प्रेमात पडली होती.
गिनीने कपिल शर्माला प्रत्येक सुख-दु:खात साथ दिली. यशाचं उंच शिखर गाठल्यानंतर कपिलही गिन्नीला विसरला नाही. कपिलने 2018 मध्ये गिन्नीशी लग्न केले. त्यांना दोन सुंदर मुले आहेत.