PHOTO : उफ्फ तेरी अदा!! पिवळ्या साडीत खुललं जान्हवी कपूरचं सौंदर्य!
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने 6 मार्च रोजी तिचा 25वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त जान्हवीने तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयादरम्यान, जान्हवी कपूर पिवळ्या रंगाची साडी आणि गुलाबी ब्लाऊजमध्ये दिसली. ही साडी तिच्यावर खूप छान दिसत आहे.
दरम्यान, जान्हवी कपूरसोबत आणखी काही लोक या फ्रेममध्ये दिसत आहेत.
यावेळी जान्हवी कपूरने तिच्या केसांची वेणी बांधली आहे. कानात झुमके आणि गळ्यात नेकलेस घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.
हे फोटो शेअर करताना जान्हवी कपूरने कॅप्शनमध्ये 'ओम श्री वेंकटेश्वराय नमो नमः श्रीमन नारायण नमो नमः तिरुमल तिरुपती नमो नमः जय बालाजी नमो नमः' हा मंत्र लिहिला आहे.
जान्हवी कपूरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यावर चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
जान्हवी कपूरने 2018 साली 'धडक' या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड प्रवासाला सुरुवात केली होती. जान्हवी लवकरच ‘गुड लक जेरी’, ‘दोस्ताना 2’ आणि ‘तख्त’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. (PC : @ janhvikapoor/IG)