Janhvi Retro Look : जान्हवी कपूरच्या रेट्रो लूकची चाहत्यांना भूरळ; फोटो पाहून खिळेल नजर
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या धडक या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर (Jahnvi Kapoor) सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतेच जान्हवीने तिचे रेट्रो लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पांढऱ्या रंगाची साडी, स्ट्रॅप ब्लाउज आणि कानात मोठे कानातले अशा रेट्रो लूकमधील जान्हवीच्या या फोटोला नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.
जान्हवीच्या रेट्रो लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
रूही, गुंजन सक्सेना आणि घोस्ट स्टोरी या चित्रपटांमधील जान्हवीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
लवकरच जान्हवी 'गुड लक जेरी' आणि 'दोस्ताना 2' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
जान्हवीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.