Isha Ambani House Pics: ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा बंगला पाहून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित, डायमंड कट इंटीरियरपासून टेबलावरील चांदीच्या भांड्यापर्यंतचे पाहा फोटो
Isha Ambani House Gulita Inside Photos: देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानीने आनंद पिरामल यांच्यासोबत झालेल्या लग्नानंतर 2018 मध्ये अँटिलिया सोडली. लग्नानंतर आम्ही तुम्हाला त्यांच्या घराची छायाचित्रे दाखवणार आहोत ज्यामध्ये आनंद पिरामल यांनी अंबानी कुटुंबाची मुलगी ईशाला राणीप्रमाणे ठेवलं आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी लग्न केल्यानंतर ईशा अंबानीने अँटिलिया सोडलं आणि ती नवीन बंगल्यात राहायला गेली. ईशा आणि आनंद 'गुलिता' हे घरही एखाद्या मोठ्या महालापेक्षा कमी नाही.
या घराचे बांधकाम 2015 मध्ये सुरू झाले होते. हा बंगला सी-फेसिंग आहे, यासोबतच अरबी समुद्राची अनेक रंजक दृश्ये इथून पाहायला मिळतात.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे घर डायमंड थीमवर बनवण्यात आले असून ही डायमंड थीम घराच्या बाहेरून आतपर्यंत सर्वत्र दिसते.
ईशा आणि आनंदच्या लग्नानंतर या जोडप्याला हा पाच मजली बंगला भेट म्हणून मिळाला होता. अजय पिरामल फार्मास्युटिकल, वित्तीय सेवा, रिअल इस्टेट, माहिती सेवा आणि ग्लास पॅकेजिंगचा व्यवसाय करतात.
2012 मध्ये ईशाचे सासरे म्हणजे अजय पिरामल यांनी ही मालमत्ता हिंदुस्तान युनिलिव्हरकडून सुमारे 10 अब्ज डॉलर म्हणजेच 450 कोटी रुपयांना खरेदी केली होती. नूतनीकरणानंतर, या मालमत्तेची किंमत अनेक पटींनी वाढली आहे.
घरातील प्रत्येक वस्तू अतिशय प्राचीन आणि मौल्यवान आहे. घरातील सर्व लोकांना आणि पाहुण्यांना चमचमीत चांदीच्या भांड्यात जेवण दिले जाते.
'गुलिता' 50 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला असून, त्यात पाच मजले आहेत.
पाच मजल्यांपैकी तीन तळघर आहेत. यात सर्विस आणि पार्किंगसाठी दुसरा आणि तिसरा मजला आहे.
घरातील झुंबरांपासून प्रत्येक वस्तू अतिशय खास आहे, जी परदेशातून आयात केली आहे.
जेव्हा हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडकडे ही मालमत्ता होती, तेव्हा हा बंगला प्रशिक्षण केंद्र असायचा. 2012 मध्ये ही मालमत्ता अजय पिरामल यांनी सुमारे 10 अब्ज डॉलर म्हणजेच 450 कोटी रुपयांना खरेदी केली होती.
या बंगल्याला खास डायमंड थीम मध्ये बनवण्यात आले आहे. दक्षिण मुंबईतील वरळी येथे असलेले 'गुलिता' अतिशय सुंदर आहे. बंगल्याच्या इंटिरिअरवरही जास्त भर देण्यात आला आहे. ईशा आणि आनंदच्या घराची रचना अगदी वेगळी आहे.