wedding bells : Ankita Lokhande पासून Shraddha Arya पर्यंत, या अभिनेत्रींचं लवकरच होणार लग्न
बॉलिवूड असो वा टेलिव्हिजन, लग्नाचा मोसम येताच शहनाई वाजू लागते. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेसह अनेक टीव्ही सेलिब्रिटी आहेत जे लवकरच लग्नाच्या तयारीत आहेत. यामध्ये श्रद्धा आर्य आणि मौनी रॉयसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. रिपोर्ट्सनुसार अंकिता तिचा प्रियकर विकी जैनसोबत पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे
कलर्सच्या उत्तरन मालिकेत दिसलेली अभिनेत्री श्रीजिता डे हिचे लग्न या वर्षी होणार होते, पण महामारीमुळे तिच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या.
टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिस सध्या कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत दिसत आहे. अलीकडेच तिने एका मुलाखतीत कबूल केले की ती कोणालातरी डेट करत आहे आणि लवकरच लग्न करू शकते.
टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत नाव कमावणारी नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉयचे नावही या यादीत सामील आहे. बातम्यांनुसार, मौनी रॉय पुढील वर्षी जानेवारीत बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्न करणार आहे.
नामकरण मालिकेतील अभिनेत्री पूनम प्रीतचे लग्नही याच महिन्यात २६ नोव्हेंबरला होणार आहे.
टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्यने तिच्या लग्नाला मीडियापासून बरेच दिवस दूर ठेवले होते. बातम्यांनुसार, ती 16 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाचे सर्व विधी दिल्लीत पार पडणार आहेत.
टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीनेही लग्नाचा निर्णय घेतला आहे. वृत्तानुसार, देवोलिना 2022 मध्ये लग्न करणार आहे.