Met Gala 2024: ईशा अंबानी दिसली साडी गाऊनमध्ये, ड्रेस तयार करण्यासाठी लागले इतके हजार तास; जाणून घ्या

न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये मेट गाला 2024 सुरू झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जगभरातील फॅशनप्रेमी या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोमध्ये हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक स्टार्स आपली उपस्थिती लावत आहेत.

आलियानंतर आता ईशा अंबानीच्या मेट गाला लूकची सर्वत्र चर्चा होत आहे.
मेट गाला 2024 ला उपस्थित राहणे ही कोणत्याही कलाकारासाठी मोठी गोष्ट आहे.
जगभरातील अनेक सेलिब्रिटी या फॅशन इव्हेंटचा भाग होण्याचे स्वप्न पाहतात, परंतु ज्यांना मेट गालाने आमंत्रित केले आहे तेच या शोमध्ये सहभागी होऊ शकतात.
दरवेळेप्रमाणे या वेळीही ईशा अंबानी या ग्रँड फंक्शनमध्ये तिच्या स्टायलिश लूकमध्ये दिसली.
या खास प्रसंगी ईशा अंबानीने सोनेरी रंगाचा साडीचा गाऊन परिधान केला होता.
या ड्रेसमध्ये ईशा खूपच सुंदर दिसत आहे. तिची साडी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. या जागतिक कार्यक्रमासाठी, तिला अनैता श्रॉफ अदजानिया यांनी स्टाइल केले होते, तर तिची साडी राहुल मिश्राने डिझाइन केली होती. 10,000 तासात ही साडी तयार झाली.
ईशा अंबानीचा मेट गाला 2024 चा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या साडीच्या गाऊनमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. ' यंदाच्या मेट गालाची थीम 'द गार्डन ऑफ टाइम' आहे, त्यानुसार ईशाच्या ड्रेसवर अनेक फुलपाखरेही डिझाइन करण्यात आली आहेत. (photo:anaitashroffadajania/ig)