Irrfan Khan Death Anniversary: पत्नी सुतापा आणि मुलगा बाबिलसोबतचे इरफानचे Unseen Photo
बॉलिवूड आणि ह़ॉलिवूड, थोडक्यात काय तर संपूर्ण अभिनय विश्वात आपलं अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता इरफान खान यांना विशेष ओळखीची गरजच नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइरफान खान यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबाला मोठा हादरा बसला होता. पण, या अभिनेत्याच्या आठवणींच्या रुपानं कुटुंबानं त्यांचं अस्तित्व जोपासलं.
इरफान खान यांचा मुलगा बाबिल पत्नी सुतापा यांचे त्रिकोणी कुटुंब होतं.
जीवनात संघर्षाला न मुकलेला या अभिनेता कारकिर्दीत बरीच यशशिखरं गाठून गेला. 29 एप्रिल 2020 या दिवशी इरफान खान यांनी जगाचा निरोप घेतला.
निधनानंतर अर्थातच कलाविश्वात एक पोकळी निर्माण झाली.
'मकबूल', 'द लंच बॉ़क्स', 'पान सिंह तोमर', 'हासिल', 'लाईफ ऑफ पाय', 'अंग्रेजी मीडियम', 'करीब करीब सिंगल', 'कारवाँ', 'पीकू' या आणि अशा कित्येक चित्रपटातील विविध भूमिकांच्या माध्यमातून इरफान खान आजही प्रेक्षकांची दाद मिळवत आहेत.