32 वर्षांची 'ही' ग्लॅमरस गर्ल आलिया-जान्हवीवर पडतेय भारी, वडील देशातील सर्वात श्रीमंत फिल्ममेकर, त्यांना म्हणतात भारताचे बिल गेट्स
India Richest Filmmaker Kalanithi Maran Daughter Kavya Maran: या ग्लॅमरस गर्लच्या वडिलांबाबत सांगायचं तर, त्यांना भारताचे बिल गेट्स म्हणून ओळखलं जातं. कमाईच्या बाबतीत तर तिच्या वडिलांनी फक्त बॉलिवूड नाहीतर देशभरातील सर्वच अभिनेते आणि दिग्दर्शकांना मागे टाकलं आहे. तर, मुलगी सौंदर्य आणि प्रोफेशनच्या बाबतीत अनेक लोकप्रिय अभिनेत्रींना पुरून उरली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूडपासून ते दक्षिण चित्रपटसृष्टीपर्यंतच्या लोकप्रिय अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांबद्दल तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तसेच मोठ्या नावांची आणि त्यांच्या लग्झरी लाईफस्टाईलबाबतही तुम्ही सारे ऐकून असालच. पण आज आम्ही तुम्हाला अशा सौंदर्यवतीबद्दल सांगणार आहोत, जी आलिया भट, जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे आणि राशा थडानीपेक्षाही सुंदर आहे.
फक्त सौंदर्याच्या बाबतीतच नाहीतर ही ग्लॅमरस गर्ल भल्या भल्या बॉलिवूड अभिनेत्रींना कामाच्या बाबतीतही मागे टाकते. तसेच, तिच्या वडिलांबद्दल बोलायचं झालं तर, त्यांच्यासमोर करण जोहर, आदित्य चोप्रा, साजिद नाडियाडवाला, रॉनी स्क्रूवाला यांसारखे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते पानी कम चाय आहेत. यांच्याबाबत बोलताना असं गमतीनं म्हटलं जातं की, यांच्या घरात लक्ष्मी पाणी भरते.
आम्ही ज्या ग्लॅमरस गर्लबाबत बोलत आहोत, तिचं नाव आहे, काव्या मारन. प्रसिद्ध उद्योजक आणि चित्रपट निर्माते कलानिधी यांची लेक. याव्यतिरिक्त काव्याची ओळख म्हणजे, आयपीएलच्या सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण.
काव्याचे वडील कलानिधी मारन यांना भारताचे बिल गेट्स म्हणतात. भारतातील सर्वात श्रीमंत चित्रपट निर्माता म्हणून यांना ओळखलं जातं. फोर्ब्सच्या मते, कलानिधी यांची एकूण संपत्ती 3.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच, 30,289 कोटी रुपये आहे.
मुलगी काव्या मारनची एकूण संपत्ती 409 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. त्यांचा जन्म 6 ऑगस्ट 1992 रोजी चेन्नई इथे झाला. त्याचं वय 32 वर्ष आहे. त्यांचे वडील सन ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि आई कावेरी मारन देखील सोलर टीव्ही कम्युनिटीच्या सीईओ आहेत.
काव्या मारननं लहान वयात इतकं यश मिळवलं की, तिने सारा, जान्हवी, सुहाना, आलिया आणि राशाला यांनाही मागे टाकलं आहे.
काव्या मारननं चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून वाणिज्य पदवी आणि वॉरविक बिझनेस स्कूलमधून एमबीए केलं आहे. ती तिच्या वडिलांसोबत एका आयपीएल संघाची सह-मालक आहे. तसेच, ती 2018 पासून फ्रँचायझीची सीईओ आहे.
कलानिधी मारन हे सन ग्रुपचे मालक आहेत, जे 37 टीव्ही चॅनेल तसेच सन पिक्चर्स चित्रपट निर्मिती कंपनीचे नियंत्रण करते. आणि सन पिक्चर्सच्या बॅनरखाली त्यांनी 'एन्थिरन', 'पेट्टा', 'बीस्ट', 'जेलर' आणि 'रायन' सारखे चित्रपट बनवले आहेत. रजनीकांत आणि धनुष सारख्या कलाकारांसोबत काम केले आहे.