Shehnaaz Gill : शहनाजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने आपल्या गावाची झलक दाखवली आहे..
Shehnaaz Gill : सध्या सोशल मीडियावर शहनाज गिलची (Shehnaaz Gill) प्रचंड चर्चा आहे. अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. (photo:shehnaazgill/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याचवेळी शहनाज तिच्या पिंडमध्ये म्हणजेच पंजाबमधील गावात पोहोचली आहे.(photo:shehnaazgill/ig)
यावेळी तिने आपल्या गावातील शेतातील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडीओमध्ये शहनाजही खूपच सुंदर दिसत आहे.(photo:shehnaazgill/ig)
शहनाजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने आपल्या गावाची झलक दाखवली आहे. यावेळी शहनाजने जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(photo:shehnaazgill/ig)
व्हिडीओत शहनाज कधी ट्रॅक्टरवर बसलेली दिसते, तर कधी तिचा दुपट्टा हलवत शेतात धावताना दिसत आहे.(photo:shehnaazgill/ig)
शहनाजचा हसरा आणि गोंडस चेहरा चाहत्यांना खूप आवडत असून, तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.(photo:shehnaazgill/ig)
शहनाजने या व्हिडीओसोबत ‘मेरा पिंड, मेरे खेत’ असे खास कॅप्शन लिहिले आहे.(photo:shehnaazgill/ig)
शहनाज गिलने 'बिग बॉस' सीझन 13मध्ये भाग घेतला होता, त्यानंतर तिची फॅन फॉलोइंग खूप वाढली होती. या शोमध्ये शहनाजची सिद्धार्थसोबतची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. सिद्धार्थच्या मृत्यूनंतरही चाहते दोघांनाही ‘सिदनाज’ म्हणतात आणि अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. शहनाजच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, गेल्या वर्षी तिचा 'हौसला रख' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. याशिवाय तिने अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केले आहे.(photo:shehnaazgill/ig)