Kangana Ranaut: कंगना रनौत ग्रॅमी पुरस्कार आयोजकांवर भडकली; म्हणाली...
काही दिवसांपूर्वी 64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा (Grammy Awards) लास वेगसमधील एमजीएम ग्रँड गार्डन एरिना येथे पार पडला. या सोहळ्यात संगीत क्षेत्रातमधील अनेक कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. भारतातील प्रसिद्ध संगीतकार रिकी केज आणि फाल्गुनी शाह यांना देखील ग्रॅमी पुरस्कार पटकवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut)नं देखील याबाबत एक पोस्ट शेअर करून लोकांना या पुरस्काराचा निषेध करण्यास सांगितलं आहे.
ऑस्कर आणि ग्रॅमी या दोन्ही पुरस्कारांच्या सोहळ्या दरम्यान प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाही. त्यामुळे कंगना भडकली आहे.
कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. तिने म्हटले, 'अशा लोकल पुरस्कारांचा निषेध करा. हे पुरस्कार आंतरराष्ट्रीय असण्याचा दावा करतात पण दिग्गज लोकांना हे विसरतात. ऑस्कर आणि ग्रॅमी या दोन्ही पुरस्कारांना लता मंगेशकर यांचा विसर पडला.
कंगना वेगवेगळ्या विषयांवरील तिची मत सोशल मीडियावर मांडते. सध्या ती लॉक-अप या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाचे ती सूत्रसंचालन करते. या शोमुळे सध्या ती चर्चेत आहे.
कंगनाच्या पंगा, क्विन आणि तन्नू वेड्स मनु या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच तिचा धाकड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.