PICS | लग्नसराईमध्ये फॉलो करा जान्हवी कपूरचे 'हे' ट्रेंडी लूक
जान्हवीचे हे एकंदर लूक्स पाहता, आता तुम्ही लग्नसराईच्या मोसमात कोणत्या लूकला पसंती देणार? (छाया सौजन्य- @janhvikapoor/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलेहंग्याचे अनेक प्रकार आणि रंग यांच्यामध्ये तुम्ही तुमची कलात्मकता जोडू शकता.
एखादी सुरेख साडी, वेल्वेट ब्लाऊज आणि गळ्यामध्ये एखादा चोकर, कमीत कमी मेकअप असा लूक लग्नसोहळ्यात लक्षवेधी ठरु शकतो.
हल्ली पेस्टल शेड्सना बरीच पसंती दिली जाते. त्यामुळं हा पर्यायही तुमच्यासाठी योग्य ठरु शकतो.
प्लेन साडी आणि त्यावर वर्क असणारं पोलकं, ब्लाऊज हा लूक सध्या बराच ट्रेंडमध्ये आहे.
लेहंग्याला प्राधान्य देणार असाल तर, हलका आणि एम्ब्रॉयडरी असणारा एखादा लेहंगा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
लग्नसमारंभांमध्ये काही रंगांचा हमखास वापर होतो, त्यापैकीच एक म्हणजे पिवळा. त्यामुळं चारचौघात उठून दिसणारा असा हा रंग आणि त्याच रंगाची साडी तुमच्या लूकला परफेक्ट करुन जाईल यात वाद नाही.
नियमांच्या सावटाखाली का असेना, पण सध्या सर्वत्र लग्नसराईचे वारे वाहत असल्याचं पाहत आहे. कितीही कठीण काळ असला तरीही नियमांचं पालन करण्यासोबतच या लग्नसराईच्या दिवसांमध्ये सुंदर दिसण्यासाठीचा अट्टहास काही कमी झालेला नाही. त्यासाठी अनेक मैत्रीणींनी थेट सेलिब्रिटी लूक्सना प्राधान्य दिलं आहे. याच सेलिब्रिटी लूक्समध्ये जान्हवी कपूरच्याही स्टाईल स्टेटमेंटचा समावेश आहे.
सततच्या भरजरी साड्यांपासून हटके असा लूक हवा असल्याच, एखाद्या कॉकटेल पार्टीसाठी जान्हवीचा हा लाल रंगातील साडीमध्ये असणारा लूक एक उत्तम पर्याय आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -