Election 2024 Exit Polls
(Source: Dainik Bhaskar)
In Pics | नवं वर्ष, नवं घर; करीनाच्या आलिशान आशियान्याची एक झलक
जुन्या घरातील आठवणी सोबत घेत नव्या घरी वास्तव्यास गेलेल्या करीनाचा तिची बहीण करिष्मा कपूर हिनंही खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. (सर्व छायाचित्र- इन्स्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरीनाच्या या घरात जुन्या आणि नव्या संकल्पनांची सांगड घातल्याचं पाहायला मिळत आहे.
लहान मुलांसाठी सैफिनाच्या या घरी खास इंटेरिअर करण्यात आलं होतं.
वडिलांप्रमाणंच छोटा नवाब, तैमूरही वॉल आर्ट करताना दिसला होता.
एकदा सैफनं त्यांच्या जुन्या घरातील बाल्कनीमध्ये करीनासाठी वॉल आर्टही केलं होतं.
नवं घर नव्या आशा घेऊन येणारं असलं तरीही जुन्या घराशीची करीना आणि तिच्या कुटुंबाच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. इथं सैफ आणि तैमुरचे काही फोटो पाहून याचा सहज अंदाज लावता येतो.
नव्या घरात राहण्यास गेल्यामुळं करीनाला चाहत्यांपासून तिच्या मित्रमंडळींपर्यंत सर्वजण शुभेच्छा देत आहेत.
तिचं नवं घरंच नव्हे, तर जुनं घरही तितकंच सुरेख होतं. सोशल मीडियावर बेबोच्या जुन्या घराचीही झलक अनेकदा पाहायला मिळाली होती.
पुस्तकांच्या खास जागेशिवाय घरात व्हिंटेज लँपनं सुरेख रोषणाईही करण्यात यायची.
करीनाचा पती, अभिनेता सैफ अली खान याला वाचनाची फार आवड आहे. त्यामुळं त्याच्या जुन्या घरात पुस्तकांसाठी एक खास जागा होती.
खुद्द करीनानंच सोशल मीडियायवर तिच्या नव्या घरातील काही फोटो पोस्ट केले आहेत. नवी सुरुवात...., अशा आशयाचं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
'बेबो', या नावानं हिंदी कलाविश्वात ओळखली जाणारी अभिनेत्री करीना कपूर खान, ही जीवनाच्या एका वेगळ्या टप्प्यावर आहे. येत्या काही दिवसांमध्ये करीना तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. त्याआधीच ती, पती सैफ आणि मुलगा तैमूर यांच्यासह नव्या घरी वास्तव्यास गेली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -