57 वर्षांत एकाच नावाचे 6 चित्रपट, राजेश खन्नांपासून ते इम्रान हाश्मीपर्यंत अनेकांची भूमिका; कोण ठरलं हिट कोण फ्लॉप?
बॉलिवूडमध्ये अनेकवेळा एकाच नावाचे अनेक चित्रपट येतात. मात्र बॉलिवडूमध्ये गेल्या 57 वर्षांत एकाच नावाने तब्बल सहा चित्रपट आलेले आहेत. 1967 ते आतापर्यंत म्हणजेच एकूण 57 वर्षांत राज या नावाने एकूण सहा चित्रपट आलेले आहेत. यातील काही चित्रपट सुपरहिट ठरले तर काही चित्रपट फ्लॉप झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1967 साली सर्वातं अगोदर राज या नावाने चित्रपट आला. या चित्रपटात राजेश खन्ना यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाला रविंद्र दावे यांनी दिग्दर्शित केले होते. तेव्हा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यावेळी या चित्रपटाने 1 कोटी रुपये कमवले होते.
राज या नावाने 1981 साली दुसरा चित्रपट आला. या चित्रपटात राज बब्बर आणि सुलक्षणा पंडित हे प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटात हिरोचे नावदेखील राज असेच होते. हरमेश मल्होत्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता.
त्यानंतर 2002 साली डीनो मोरिया आणि बिपाशा बसू यांची प्रमुख भूमिका असलेला राज या नावाने तिसरा चित्रपट आला. हा चित्रपटही सुपरहिट ठरला. हा एक भयपट होता. या चित्रपटातील गाणेदेखील सुपरहिट राहिले.
त्यानंतर 2009 साली राज- द मिस्ट्री कन्टीन्यूस या नावाने नवा चित्रपट आला. या चित्रपटात इम्रान हाश्मी, कंगणा रनौत हे प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपटही अनेकांना आवडला. त्यानंतर 2012 साली राज द थर्ड डायनेन्शन या नावाने पाचवा चित्रपट आला. या चित्रपटात इम्रान हाश्मी, इशा गुप्ता, बिपाशा बसू हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटात बिपाशाने नकारात्मक भूमिका साकारली होती. या चित्रपटालाही अनेकांनी पसंद केले.
त्यानंतर 2016 साली राज- रिबूट नावाने नवा चित्रपट आला. विक्रम भट्ट यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट मात्र फारसा चालला नाही.