Weekly Horoscope 02 To 08 December 2024 : मेष ते मीन सर्व 12 राशींसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा कसा असेल? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा आशावादी असणार आहे. या आठवड्यात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तसेच, तुमच्यासाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तुमच्या नात्यात सामंजस्य टिकून राहील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवृषभ राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. कोणताही निर्णय घेताना घाईगडबडीत घेऊ नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल. तसेच, अपयश आल्यास खचून जाऊ नका.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगली बातमी घेऊन येणारा असेल. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल.
कर्क राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा नवीन आठवडा फार मेहनतीचा असणार आहे. तसेच, या आठवड्यात तुम्ही संयम ठेवण्याची गरज आहे. तुम्ही प्रवास करताना सतर्क राहा. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा मेहनतीचा असणार आहे. या आठवड्यात रोजगार आणि करिअरमध्ये तुमच्या प्रगतीचे संकेत आहेत. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन सुखी होईल.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फार शुभकारक असणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या उत्तम संधी आहेत. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण मिळेल. या काळात धार्मिक यात्रेला जाण्याचा योग आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. करिअरमध्ये तुम्हाला संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. या काळात कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा मिश्रित स्वरुपाचा असणार आहे. या दरम्यान तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तुमच्या नात्यात प्रेम दिसून येईल.
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा प्रगतीचा असणार आहे. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती चांगली असेल.
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार धैर्याचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. तसेच, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
कुंभ राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. तुमच्या करिअरमध्ये अनेक आव्हानं येऊ शकतात. नात्यात प्रेमसंबंध टिकून राहील.
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा महत्त्वाचा असणार आहे. तुमच्या नात्यात विश्वास दिसून येईल. तसेच, या काळात प्रवास करताना सांभाळून करा. आरोग्याची काळजी घ्या.