'ये लाल इश्क...' पाहा हिनाचा घायाळ करणारा अवतार!
हिना खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून हिना खानने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं.
या मालिकेसह 'कसौटी जिंदगी की 2' आणि 'खतरों के खिलाडी 8','बिग बॉस 11' या कार्यक्रमांमध्येही ती सहभागी झाली आहे.
यावेळी हिना खानने लाल रंगाची पांढरी आणि काळी प्रिंटेड साडी परिधान केली आहे.
हिना खानने लाल प्रीटेंड साडीसह लो नेकलाइनसह काळ्या रंगाचा ट्यूब स्टाइल स्ट्रॅपी ब्लाऊज घातला आहे.
हा ब्लाऊज अभिनेत्रीचा हा साडी लुक आणखीनच आकर्षक बनवत आहे.
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हिना खानने हटके ज्वेलरी निवडली.
अभिनेत्रीने तिच्या कानात मोठे झुमके आणि हातात खूप बांगड्या घातल्या होत्या.
अभिनेत्रीने तिच्या लूकचे अनेक क्लोज-अप फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचे काळेभोर डोळे आणि कपाळावर काळ्या रंगाची बिंदी खूप सुंदर दिसत आहे.
हिनाने तिचे हे मनमोहक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत जे लोकांना खूप आवडले आहेत.(pc: hina khan instagram )