Harnaaz Sandhu : मिस युनिव्हर्स सोहळ्यासाठी हरनाज संधूचा खास गाऊन; पाहा फोटो!

अमेरिकेची आर बोनी गॅब्रिएल (R’Bonney Gabriel) ही 'मिस युनिव्हर्स-2022' (Miss Universe 2022) या स्पर्धेची विजेती ठरली आहे. आर बोनी गॅब्रिएलला मिस युनिव्हर्स 2022 मुकुट माजी मिस युनिव्हर्स भारताची हरनाज कौर संधूच्या हस्ते देण्यात आला. (फोटो सौजन्य:harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हा ताज प्रदान करताना हरनाजही खूप भावूक झाली. (फोटो सौजन्य:harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)

या खास प्रसंगी हरनाज जबरदस्त ड्रेसमध्ये दिसली. (फोटो सौजन्य:harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)
तिचा पेहराव अगदी अनोखा होता, शिवाय या माध्यमातून तिनं भारतातून मिस युनिव्हर्स झालेल्या सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांना सलाम केल्याचं दिसून आलं. (फोटो सौजन्य:harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)
माजी मिस युनिव्हर्स हरनाज संधूच्या ड्रेसवर एक खास चित्र छापण्यात आले होते. या मोठ्या मंचावर हरनाजने सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांचा सन्मान केल्याचं दिसलं. मिस युनिव्हर्स 1994 सुष्मिता सेन आणि मिस युनिव्हर्स 2000 लारा दत्ताचा फोटो हरनाजच्या ड्रेसच्या मागच्या बाजूला दिसून आला. भारताने तीन वेळा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला आहे. (फोटो सौजन्य:harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)
या खास प्रसंगी माजी मिस युनिव्हर्स हरनाज संधूने काळा आणि चंदेरी कलरचा सुंदर गाऊन परिधान केला होता. जे हेवी फ्लो मटेरियलने तयार केले होते. हा ड्रेस सई शिंदेने डिझाइन केला आहे. (फोटो सौजन्य:harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)
भारताच्या हरनाज संधूनं यावेळी आर बोनी गॅब्रिएलला मिस युनिव्हर्सचा मुकुट घातला. (फोटो सौजन्य:harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)
पण जेव्हा हरनाजला 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेच्या रॅम्पवर चालताना दिसली तेव्हा ती पुन्हा एकदा ट्रोलच्या निशाण्यावर आली. (फोटो सौजन्य:harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)
तिच्या वाढलेल्या वजनामुळे अभिनेत्रीला पुन्हा ट्रोल केले जात आहे. (फोटो सौजन्य:harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)