Diwali 2021 : आली दिवाळी... खणाच्या साडीचे आकर्षक आकाश कंदील!
सध्या जुन्या काळातील अनेक स्टाईल या पुन्हा बाजारात येताना पहायला मिळत आहेत....
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयात आपल्या पेहरावाची स्टाईल असेल वा भारतीय संस्कृतीतल्या अनेक वस्तूंची... इतकच काय आता अनेकजण चुलीवरच्या जेवणाच्या शोधातही असतात....
असाच एक जुना पेहराव म्हणजे आजीची खणाची साडी
याचाच आधार घेत काही महिलांनी वापरलेली नामी शक्कल ही बाजारात चांगलाच भाव खाऊन जात आहे.
याच खणाच्या साडीच्या ट्रेंडचा मात्र साताऱ्यातील काही महिलांनी चांगलाच उपयोग केला.
त्यांनी चक्क खणाच्या साडीपासून तयार केलेले आकाश कंदीलच दिवाळीसाठी बाजारात आणलेत.
तन्वी जाधव या आर्ट अॅन्ड क्राफ्टच्या शिक्षिका आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांच्या डोक्यातली ही भन्नाट कल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली आणि त्यांच्या कल्पनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरु झाली
इमारतीमधील महिलांना एकत्र घेऊन त्यांनी सर्वांनाच आकाश कंदीलाची किमया शिकवला. आता हा ट्रेंड या सर्वच महिलांच्या कुटुंबाला हातभार लावणारा ठरला आहे.