Happy Birthday Rekha: जेव्हा सगळ्यांनी साथ सोडली तेव्हा रेखाने आपले नशीब असे बदलले...
'आँखों की मस्ती के, मस्ताने हजारों हैं...' हे गाणे रेखाला अगदी शोभते. या गाण्यावर परफॉर्म करून तिने हे गाणे अजरामर केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेखा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार आहे जी आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे.
अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना केला, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही.
रेखा दक्षिणेतील अभिनेता जेमिनी गणेशन आणि अभिनेत्री पुष्पावली यांची मुलगी होती. त्यावेळी आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुष्पावली ही मिथुनची पत्नी नव्हती.
जेमिनीचे आधीच लग्न झालेले असताना रेखाच्या आई-वडिलांचे नाते सुरू झाले. तर पुष्पावलीने पतीला घटस्फोट दिला नाही. त्यामुळे त्यांचे संबंध वैध नव्हते.
रेखाच्या वडिलांनी तिच्या आईला प्रेम, पैसा, प्रसिद्धी सर्वकाही दिले, परंतु तिचे नाव दिले नाही. रेखाचा जन्म झाला तेव्हा तिला नाजायज मुलगी असा टॅग लागला.
अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी सर्वांच्याच ओठावर आहे. फार कमी लोकांना माहित आहे की रेखा आणि जया एकेकाळी खूप जवळच्या मैत्रिणी होत्या. मात्र जया बच्चन यांच्या लग्नामुळे दोघांमधील अंतर वाढले. जेव्हा जयाने रेखाला तिच्या लग्नाचे आमंत्रण दिले नव्हते.
रेखाने मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले. पण त्यांचे लग्न वर्षभरही टिकू शकले नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिप्रेशनने त्रस्त असलेल्या मुकेशने रेखाच्या ओढणीने गळफास लावून घेतला होता.
त्यानंतर अभिनेत्रीला काम मिळणे बंद झाले. लोकांनी अभिनेत्रीला दुष्ट, डायन असे अनेक टॅग दिले.
ज्या चित्रपटात ती काम करत होती त्या दिग्दर्शकानेही तिला चित्रपटातून काढून टाकण्याचा कट रचला.
पण रेखाने हार मानली नाही आणि हिंदी चित्रपटसृष्टीची सुपरस्टार बनण्यासाठी संपूर्ण जगाशी लढा दिला.