Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gulzar : गुलजार... शब्दांचे जादूगार!
गुलजार म्हणजे शब्दांचे जादूगार... गुलजार म्हणजे साहित्यविश्वाला पडलेलं एक सुरेख स्वप्न... शब्दात खेळणाऱ्या या अवलियाबद्दल बोलताना शब्दही अपुरे पडावेत. (PHOTO : @gulzaronline/Facebook)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज गीतकार गुलजार यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 रोजी पंजाबमधील दीना येथे झाला. हे ठिकाण सध्या पाकिस्तानात आहे. (PHOTO : @gulzaronline/Facebook)
गुलजार केवळ उत्तम गीतकारच नाही, तर उत्तम संवाद आणि पटकथा लेखकही आहेत. तसेच ते उत्तम दिग्दर्शकही आहे. (PHOTO : @gulzaronline/Facebook)
गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा आहे. (PHOTO : @gulzaronline/Facebook)
भारतातील एक कवी, गीतकार, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अशा बहुमुखी प्रतिभेचे धनी गुलजार म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीला सापडलेला शब्दांचा जादूगार असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. (PHOTO : @gulzaronline/Facebook)
'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' सारखं गुलजारांचं काव्य काळजाला हात घालतं, तर माचिस चित्रपटातलं 'पानी पानी रे' ऐकताना डोळ्यात चटकन पाणी तराळतं. (PHOTO : @gulzaronline/Facebook)
एकीकडे हृदय पिळवटून टाकणारी गाणी लिहिणारे गुलजार आजच्या काळाशी सुसंगत गाणीही ज्या वकुबाने लिहितात, ते पाहून रसिक मंत्रमुग्ध होतो. 'आँखे भी कमाल करती है, पर्सनल से सवाल करती है' आणि 'ओमकारा'मधलं 'बिडी जलायले' आजच्या पिढीला कनेक्ट करणारे शब्द ही गुलजारसाहेबांची ताकद. (PHOTO : @gulzaronline/Facebook)
(PHOTO : @gulzaronline/Facebook)
(PHOTO : @gulzaronline/Facebook)