Govinda Divorce Rumors: गोविंदा 30 वर्षांच्या मराठी अभिनेत्रीला करतोय डेट?; काही वर्षांपूर्वी म्हणाला होता, माझ्या कुंडलीत...

बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda Divorce) त्याची पत्नी सुनीता आहुजा हिच्यापासून घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गोविंदाची पत्नी सुनीता अहूजाने काही मुलाखतीमध्ये याबाबत हिंट दिली होती. ते दोघेही गेल्या कित्येक वर्षांपासून वेगळे राहात असल्याचे तिने सांगितले होते.

गोविंदाचं एका 30 वर्षांच्या मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्यामुळे त्याच्यात आणि सुनीता अहुजामधील मतभेद वाढल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, ही 30 वर्षीय मराठी अभिनेत्री कोण? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
गोविंदा आणि सुनीता यांच्या लग्नाला 37 वर्षे झाली आहेत. या जोडप्याला यशवर्धन आणि टीना ही दोन मुले आहेत.
30 वर्षीय अभिनेत्रीसोबतच्या अफेअरच्या बातम्यांवरून लोक गोविंदाला खूप ट्रोल करत आहेत. नेटकरी म्हणतात की अभिनेत्याची मुलगी देखील 30 वर्षांपेक्षा जास्त वयाची असेल.
एका मुलाखतीमध्ये गोविंदाने दोन लग्नांबाबतही उल्लेख केला होता. तो म्हणाला होता की, पुढे कदाचित मी दुसऱ्या कुठल्या तरी मुलीमध्ये गुंतून जाईन. त्या मुलीसोबत लग्न करेन. सुनिताने या गोष्टीसाठी तयार राहिलं पाहिजे. तेव्हा ती फ्री राहू शकेल. मी नशिबावर खूप विश्वास ठेवतो. माझ्या कुंडलीमध्ये दुसऱ्या लग्नाचा योग आहे, असं गोविंदा म्हणाला होता.
गोविंदाचे नाव हे बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांच्या यादीमध्ये घेतले जाते. त्याने 80 ते 90च्या दशकात सिनेमांवर राज्य केले आहे.
गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या मीडियामध्ये सुरू आहेत. वरील वृत्त केवळ मीडिया रिपोर्ट्सच्या आधारावर देण्यात आलेलं आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.