PHOTO: प्रियांका पासून दीपिकापर्यंत.. गंगूबाई या भूमिकेसाठी आलियाच्या आधी या अभिनेत्रींना चित्रपटाची ऑफर?
आलिया भटचा (Alia Bhatt) बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) शुक्रवारी (25 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामधील आलियाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण गंगूबाई या भूमिकेसाठी आलियाच्या आधी या अभिनेत्रींना चित्रपटाची ऑफर चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिली होती-
संजय लीला भन्साळी यांनी अभिनेत्री राणी मुखर्जीला देखील गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची ऑफर दिली होती. पण नंतर राणी आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. राणीनं संज लीला भन्साळी यांच्या ब्लॅक या चित्रपटामध्ये काम केले आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या रामलीला, पद्मावत, बाजीराव मस्तानी या चित्रपटांमध्ये दीपिकानं प्रमुख भूमिका साकारली. अनेकदा दीपिकानं संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसला भेट दिली त्यामुळे दीपिका गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात होते.
अभिनेत्री प्रियांका चोप्राला देखील गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाची ऑफर देण्यात आली. पण प्रियांकानं या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कारण ती त्यावेळी दोन हॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग करत होती.
गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात आलिया भट, शांतनु,अजय देवगण विजय राज, सीमा पाहवा यांनी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.