Pearl V Puri पासून ते Abhinav Kohli पर्यंत कायदा तोडल्यामुळे 'या' टिव्ही स्टार्सला झाली होती अटक, पाहा फोटो
31 वर्षीय 'नागिन 3'चा अभिनेता पर्ल वी पुरीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत एका अल्पवयीन मुलीवर कथितरित्या छेडछाड आणि बलात्कार केल्याचा आरोप झाला आहे. हे एक जुनं प्रकरण आहे, ज्यात अल्पवयीन मुलाने पर्लवर बलात्काराचा आरोप केला होता. अनेक टीव्ही कलाकार टीव्ही कलाकार पर्ल पुरीच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेता करण मेहराला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर पत्नी निशा रावलने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती.
अबीगेल पांडे आणि सनम जोहर हे टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडपं आहे. एनसीबीने त्यांच्या घरी छापा टाकून ड्रग्ज जप्त केलं होतं. सनम आणि अबीगेल यांनी ड्रग्ज घेतल्याची कबुलीही दिली होती. एनसीबीने त्यांची जवळपास चार ते पाच तास चौकशी केली होती.
बिग बॉस फेम एजाज खानला एनसीबीने अटक केली होती. त्याच्या घरी अंमली पदार्थ सापडले होते. एजाज खानला राजस्थानहून आल्यानंतर मुंबई विमानतळावरुन अटक केली होती.
अभिनेत्री श्वेता तिवारीने दुसरा पती अभिनव कोहलीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. माझ्या अनुपस्थितीत अभिनवने मुलगी पलक तिवारीला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. परंतु अभिनव कोहलीने हे आरोप फेटाळले आहेत.
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्यावर घरात 86.5 ग्रॅम अंमली पदार्थ ठेवल्याच्या आरोपात अटक केली होती. या दाम्पत्याने एनसीबीसमोर अंमली पदार्थांचं सेवन केल्याची कबुली दिली होती. दोघांचीही सुटका झाली असून ते सध्या रिअॅलिटी शोचं निवेदन करत आहेत.
डॉक्टरांवर अयोग्य टिप्पणी केल्याचा आरोपाखाली कॉमेडियन सुनील पाल याच्यावर गुन्हा दाखल केला होता. सोशल मीडिया एका व्हिडीओमध्ये सुनील पालने कोविड-19 रुग्णांचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा उल्लेख 'दानव' असा केला होता.
बिग बॉस फेम अरमान कोहलीविरोधात लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये प्रतिस्पर्धी सोफिया हयातने बिग बॉसच्या घरात मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्याला जेलवारी करावी लागली होती.