Friendship Day Special: शोलेपासून ते डियर जिंदगीपर्यंत, मैत्रीचं निखळ नातं सांगणारे हे दमदार चित्रपट पाहिलेत का?
करण जोहर यांनी दिग्दर्शित केलेला 'कुछ कुछ होता है' हा चित्रपटदेखील मैत्रीच्या नात्यावर भाष्य करतो. या चित्रपटापासून फ्रेंडशिप बॅन्डची क्रेझ आली. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोलची मैत्री दाखवली आहे. हा चित्रपट तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीणींसोबत प्राइम व्हीडिओवर पाहू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजोया अख्तर यांनी दिग्दर्शित केलेला 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट मैत्रीच्या नात्यावर भाष्य करतो. हा चित्रपट प्राइम व्हीडिओवर बघू शकता.
रमेश सिप्पी हे 'शोले' चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 'शोले' हा चित्रपट 15 ऑगस्ट 1975 मध्ये प्रर्दशित झाला होता. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र या दोघांची मैत्री दाखवलेली आहे. 'शोले' चित्रपटातील 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे' हे गाणं खूप प्रसिद्ध झालं होतं. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हीडिओवर बघू शकता.
अभिषेक कपूर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट 'काई पो चे' हा सुपरहिट चित्रपट आहे. हा चित्रपट चेतन भगतच्या 'द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' या पुस्तकातील कथेवर आधारलेला आहे. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत, राजकुमार राव आणि अमित साध यांनी प्रमुख भूमिका साकारलेली आहे. हे तिघेही या चित्रपटात एकमेकांचे मित्र आहेत. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर बघू शकता.
राजकुमार यांनी दिग्दर्शित केलेला '3 इडियट्स' चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटात आमिर खान, आर माधवन, शरमन जोशी यांची मैत्री दाखवली आहे. हा चित्रपट प्राइम व्हीडिओवर बघू शकता.
फरहान अख्तर यांनी 'दिल चाहता है' या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात आमीर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान एकमेकांचे मित्र दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट प्राइम व्हीडिओवर बघू शकता.
2016 साली प्रदर्शित झालेल्या 'डियर जिंदगी' या चित्रपटात डॉक्टर आणि पेशंटची अनोखी मैत्री दाखवलेली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि शाहरुख खान यांची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला 'जवानी है दिवानी' या चित्रपटात प्रेम कथा दाखवली आहे. परंतु हा चित्रपट मैत्रीभोवती फिरताना दिसतो. हा चित्रपट तुम्ही मैत्र- मैत्रीणींसोबत प्राइम व्हीडियोवर पाहू शकता.