In Pics | 'स्ट्रेच मार्क्स'ची ऐशी की तैशी; मलायकानं जिंकली चाहत्यांची मनं
मलायका आणखी एका कारणामुळंही कलाविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे, ते कारण म्हणजे अभिनेता अर्जुन कपूरसोबतचं तिचं नातं. अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे रिलेशनशिपमध्ये असून, आता त्यांचं नातं सर्वज्ञात आहे. त्यामुळं चाहत्यांना आणि कलावर्तुळालाही या सेलिब्रिटी कपलच्या लग्नाचीच उत्सुकता लागून राहिली आहे. (सर्व छायाचित्रं- इन्स्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबरं, असे फोटो अथवा स्ट्रेच मार्क्स लपवण्यासाठी फारशी मेहनत न घेण्याची ही तिची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा तिचा असाच अंदाज पाहायला मिळाला होता.
मागील काही दिवसांपासून बॉडी शेमिंगबाबत बऱ्याच चर्चा सुरु आहेत, अगदी खुलेपणानं या मुद्द्यांवर बोललंही जात आहे, त्यातच मलायकाचे हे फोटो म्हणजे शरीरावरुन एखाद्या व्यक्तीची खिल्ली उडवणाऱ्यांना सणसणीत चपराक ठरत आहेत.
मलायका सध्याच्या दिवसांमध्ये जेव्हा केव्हा बाहेर पडते तेव्हा ती कोविडबाबतीच सर्वच काळजी घेताना आणि नियमांचं पालन करताना दिसते.
नुकतेच मलायकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंमध्ये ती गुलाबी रंगाच्या टॉप आणि योगा पँटमध्ये दिसत आहे. बरं इथं मलायकाचे स्ट्रेच मार्क्ससुद्धा अगदी स्पष्टपणे दिसत आहेत. पण, त्याचीही तमा न बाळगता वावरणारी मलायका खऱ्या अर्थानं सर्वांची मनं जिंकत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. फॅशन आणि स्टायलिंगच्या दुनियेत मलायका कायमच अनेकांच्याच प्रेरणास्थानीही आहे असं म्हणायला हरकत नाही. अशी ही अभिनेत्री सध्या चर्चेत आहे ते म्हणजे बॉडी शेमिंगला न जुमानता तिचे स्ट्रेच मार्क्स् फ्लाँट करण्यासाठी.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -