'शालू'च्या फोटोंना 'इंग्रजी' कॅप्शन, चाहत्यांकडून 'मराठी'चा हट्ट, ग्लॅमरस राजेश्वरीचं हटके उत्तर!
'फँड्री' चित्रपटात जब्या अर्थात सोमनाथ अवघडे आणि पिऱ्या म्हणजे सुरज पवार यांच्यासह आणखी एक कलाकार आपली वेगळी ओळख बनवण्यात यशस्वी ठरली होती. ती म्हणजे चित्रपटातील शालू म्हणजे अभिनेत्री राजेश्वरी खरात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेष म्हणजे ती अनेकदा चाहत्यांच्या कमेंटवर देखील उत्तरं देताना दिसते. चाहते जर तिला ट्रोल करत असतील तर ती अगदी प्रेमाने टोलेबाजी करताना देखील पाहायला मिळते.नुकतंच तिला तिच्या फोटोंवर इंग्रजी कॅप्शन असल्यानं ट्रोल केलं गेलं. त्यावर तिनं चाहत्यांना अगदी प्रेमानं उत्तरं दिलं.
ती म्हणाली की, खरी सत्यता अशी देखील आहे की बर्याच English शब्दांना मराठी मध्ये काय म्हणतात हे कुणाला माहितीसुद्धा नाही आणि फक्त मराठी बोला मराठी आदर्श बाळगा असे बोलून आपण भाषा, राष्ट्र, व्यक्ति आणि त्यांच्या विचारांमधे भेद निर्माण करतो किवा एका प्रकारे फुट पाडतो. हे बरोबर नाही.
तिनं म्हटलं की, बाकीचे कलाकार मराठी मध्ये व्यक्त होतात किंवा नाही I don't know, परंतु ते सर्वजण सही ( स्वाक्षरी ) मात्र English मध्ये करत असतील असा माझा अंदाज आहे.
तिनं म्हटलं की, बाकी मराठी सिनेमा न चालण्यामागचे कारण सुद्धा आपणच आहोत 😊 कारण आपणच तर Bollywood, Hollywood मध्ये रुची जास्त दाखवतो आणि मराठी असल्याचा अभिमान फक्तं दाखवतो. बरेच जण मराठीत बोला असे बोलायचे म्हणुन त्या सर्वांसाठी हे उत्तर आहे. Correct me if I am wrong but That's what I really feel.
राजेश्वरी नेहमीच इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते. या फोटोंनी तिने रसिकांची मने जिंकली आहेत. राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमी आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. 'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे. राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला.
ही साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे. तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. तिचे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोवर आहेत. (सर्व छायाचित्रं- राजेश्वरी खरातच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)