In Pics | लग्नानंतर अगदी लगेचच 'या' अभिनेत्रींनी दिलेली गोड बातमी
बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी लग्नानंतर लगेचच त्यांच्या गरोदरपणाचं वृत्त जाहीर करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. यामध्ये नेहा धुपिया, दिया मिर्झासह इतरही काही सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहार्दीक पांड्या आणि नताशा स्टँकोविक यांच्या नात्यातही चिमुकल्याच्या आगमनाची बातमी सर्वांचं लक्ष वेधून गेली.
काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या अभिनेत्री दिया मिर्झा हिनंही नुकतंच ती आई होणार असल्याचं जाहीर केलं.
अभिनेता अंगद बेदी आणि अभिनेत्री नेहा धुपिया यांनीही लग्नानंतर लगेचच त्यांच्या बाळाच्या आगमनाची बातमी दिली होती.
अभिनेता रणवीर शौरी याच्याशी विवाहबंधनात अडकल्यानंतर लगेचच काही महिन्यांनी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिनं आपण गरोदर असल्याचं सांगितलं होतं.
2006 मध्ये महिमा चौधरी हिनं प्रियकर बॉबी मुखर्जी याच्याशी लग्नगाठ बांधली होती, पण ती याआधीपासूनच गरोदर असल्याचं म्हटलं गेलं.