Photo Gallery : जॅकलीन फर्नांडीसच्या वकिलाचं नोरा फतेहीच्या अब्रू नुकसानीच्या नोटिसीला उत्तर, 'आम्ही उत्तर देऊ'
मनी लाँड्रिंग प्रकरणात आता वेगळे वळण आले असून बाॅलिवूडच्या दोन अभिनेत्री समोरासमोर आल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइतकेच नव्हे तर आता थेट नोरा फतेही हिने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत थेट मानहानीचा दावा दाखल केलाय.
200 कोटींच्या खंडणी प्रकरणात आपला काहीच संबंध नसताना नाव बदनाम केले जात असल्याचे नोराने म्हटले आहे.
आता नोराच्या आरोपांवर जॅकलिन फर्नांडिस हिच्या वकिलाने प्रतिक्रिया दिली आहे.
जॅकलिन फर्नांडिसचे वकील प्रशांत पाटील म्हणाले की, नोरा फतेही यांच्याकडून मानहानीच्या खटल्याची कोणतीही प्रत मिळाली नाही, तिने तसे केल्यास कायदेशीर उत्तर देऊ
200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने दोघांची चौकशी केल्याची माहिती आहे.
नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिससह 15 मीडिया कंपन्यांवर चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला आहे.
याचिकेत म्हटले आहे की, जॅकलीन फर्नांडिस आपल्या वाढत्या करिअरशी व्यावसायिकदृष्ट्या स्पर्धा करू शकत नाही.