PHOTO: प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाचा रॉयल लूक; पाहा फोटो!

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झानं (Dia Mirza) तिच्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे(pc:diamirzaofficial/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दियाचा जन्म 9 डिसेंबर 1981 रोजी हैदराबादमध्ये झाला. दियाच्या आई दीपा या बंगाली हिंदू आहेत.(pc:diamirzaofficial/ig)

तर तिचे वडील फ्रँक हेड्रिच जर्मन आहेत. ती चार वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दियाच्या आईने हैदराबादचे अहमद मिर्झा यांच्यासोबत लग्न केले. (pc:diamirzaofficial/ig)
दियाने तिचे शिक्षण हैदराबादमध्ये केले आहे. कॉलेजमध्ये असताना तिनं काम करायला सुरुवात केली. ती एका मीडिया फर्ममध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह होती.(pc:diamirzaofficial/ig)
यादरम्यान तिनं लिप्टन, वॉल्स आईस्क्रीम, इमामी आणि इतर कंपन्यांसह सर्व मोठ्या कंपन्यांकडून मॉडेलिंगची ऑफर मिळू लागली. (pc:diamirzaofficial/ig)
दियाने 19 ऑक्टोबर 2001 रोजी प्रदर्शित झालेल्या 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (pc:diamirzaofficial/ig)
या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आर माधवन यानं प्रमुख भूमिका साकारली होती. (pc:diamirzaofficial/ig)
दियाने नुकताच तीचा एक खास रॉयल लूक शेअर केला आहे ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.(pc:diamirzaofficial/ig)