IN PICS | दोघात तिसरा..., 'त्या' व्यक्तीच्या येण्यानं संपुष्टात आलं सेलिब्रिटी जोड्यांचं नातं
एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या नात्यात ट्विंकल खन्ना हिच्या येण्यानं दुरावा आला, असं म्हटलं जातं. किंबहुना शिल्पा आणि अक्षयनं लग्नही करण्याचा निर्णय़ घेतला होता पण, त्यांचं नातं मात्र पूर्णत्वास जाऊ शकलं नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमलायका अरोरा आणि अरबाज खान याच्या तब्बल 18 वर्षांच्या वैवाहिक नात्यात दुरावा आला ही बाब अनेकांनाच धक्का देऊन गेली. मलायका आणि अरबाज या दोघांनीही वेगळ्या साथीदारांची निवड केली. मलायकाची अभिनेता अर्जुन कपूर याच्याशी वाढती जवळीक या नात्यात दुरावा आणून गेली असंही म्हटलं जातं.
कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच रणबीर आणि दीपिका हे त्यांच्या अफेअरमुळंही चर्चेत राहिले. असं म्हटलं जातं की रणबीरची कतरिना कैफशी वाढती जवळीत या नात्यात दुरावा आणण्यास कारणीभूत ठरली.
सलमान खान यानं ऐश्वर्या राय हिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली, त्यावेळी या जोडीच्या नात्यात दुरावा येऊ लागला. हे नातं पूर्वपदावर आलंही असतं, पण ऐश्वर्या रायला विवेक ओबेरॉयच्या रुपानं आधार मिळाला आणि सलमानसोबतच्या नात्यात दुरावा आला.
सुझान खान आणि हृतिक रोशन हेसुद्धा एकेकाळी मोस्ट हॅपनिंग कपल होतं. पण, हृतिकचं नाव सुरुवातीला बार्बरा मोरे आणि त्यानंतर कंगना राणौतशी जोडलं गेलं आणि तिथं त्याच्या सुझानसोबच्या नात्यातही वादळ निर्माण झालं.