Health Tips : 'या' 3 आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी चुकूनही पालक खाऊ नये; फायद्याऐवजी होईल नुकसान
Health Tips : जर तुम्ही पालकाचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर तुम्हाला अनेक त्रास होऊ शकतात.
Spinach
1/8
पालकामध्ये आढळतात, जे शरीर सुधारण्याचे काम करतात. त्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे.
2/8
पालक नियमित खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहते, डोळे निरोगी राहतात, मधुमेहापासून आराम मिळतो, हृदयाचे आरोग्य सुधारते, पचनशक्ती सुधारते.
3/8
मात्र, अनेकांना पालक न खाण्याचा सल्ला दिला जातो.
4/8
पालक खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होऊ शकते
5/8
जर कोणाला ऍलर्जीचा त्रास असेल तर त्यांनी पालकापासून दूर राहावे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पालकामध्ये हिस्टामाईन आढळते, जे खाल्ल्याने काही लोकांना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो.
6/8
जर एखाद्या व्यक्तीला स्टोनचा त्रास झाला असेल तर अशा लोकांनी पालक खाऊ नये.
7/8
आरोग्य तज्ञांच्या मते जे लोक रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत त्यांनी पालकापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. कारण व्हिटॅमिन के पालकामध्ये आढळते, जे अँटीकोआगुलंटशी प्रतिक्रिया करून शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकते.
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 06 Oct 2023 02:18 PM (IST)