World Mental Health Day : Anil Kapoor पासून Deepika Padukone पर्यंत 'या' बॉलिवूड कलाकारांकडून मानसिक आरोग्याची जनजागृती
कोरोनानंतर जगभरातील अनेक लोकांच्या जीवनशैलीत बदल झाले. लोकांना घरात राहावे लागत होते. कित्येक दिवस घरात राहिल्याने अनेकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे मानसिक आरोग्य हे केंद्रस्थानी होते. दरम्यान बॉलिवूड कलाकारांनी मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृती केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appग्लोबल स्टार प्रियंका चोप्राने सांगितले, अशा काही गोष्टी आहेत ज्या माझ्या मानसिक संतुलनावर काम करतात. आपल्याला आवडणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहणे. माझ्यासोबत माझा नवरा आणि श्वान असतात. टिव्ही बघण्यापेक्षा गप्पा मारणे फायदेशीर ठरते.
इलियाने लॉकडाउनमध्ये मानसिक स्वास्थाला महत्त्व दिले. तिने लिहिले होते, तुम्हाला तुमच्या शरीरासारखे मानसिक आरोग्याकडेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे. माझ्याजवळ असलेला भन्नाट मित्रपरिवार आणि कुटुंब माझे मानसिक आरोग्य उत्तम ठेवायला मदत करतो.
शिल्पाने मानसिक आरोग्यासंबंधित सल्ला देताना म्हटले, एखाद्या गोष्टीबाबत जास्त विचार करू नये. तिने एक फोटो शेअर करत लिहिले होते, कोरोनामुळे आसपास नकारात्मक वातावरण आहे. मनात नकारात्मक विचार येत असतात. तर दुसरीकडे काही मंडळी कोरोना रुग्णांसाठी जेवण बनवत आहेत. डॉक्टर ऑनलाइन माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत. अशा परिस्थितीत आपण गरजूंना मदत केली पाहिजे. वर्तमानात जगायला हवं.
अभिनेता अनिल कपूरने इंस्टाग्रामवर लिहिले होते, काही सकाळ दुसऱ्यांच्या तुलनेत कठीण असतात. कोरोनासारख्या आजारांचा सामना करण्यासाठी शरीर आणि मन खंबीर ठेवणं गरजेचं आहे. जर एखादी गोष्ट तुम्ही करू शकता असे तुम्हाला वाटत असेल तर ती गोष्ट तुम्ही नक्की करू शकता. इच्छा शक्तिच्या जोरावर संकल्प ठरवले पाहिजेत.
ऋचा चड्ढाने एक फोटो शेअर करत लिहिले आहे, अनेक लोकांसारखी मी देखील लॉकडाउनच्या पहिल्या आठवड्यात हैराण झाले होते. सकाळी उठल्यावर मृत्यूचा आकडा पाहिल्यानंतर वाईट वाटत होते. रस्त्यावरचे भिकारी, माथाडी कामगारांना बेघर झालेले पाहून मन सुन्न होत होते.
दीपिका पादुकोण याआधी अनेकदा मानसिक आरोग्यासंबंधी चर्चा करताना दिसून आली आहे. मानसिक आरोग्यासंबंधी तिने तिच्या चाहत्यांना सेल्फ केअरच्या टिप्सदेखील दिल्या होत्या.