Actress Rekha Income Source : दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
रेखा मागील 10 वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. तरीदेखील इतकी शानदार लाइफस्टाइल तिने कशी मेंटेन करते. तिच्या उत्पन्नाचे स्रोत काय, याची उत्सुकता अनेकांना आहे .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेखा यांच्याकडे मुंबईपासून दक्षिण भारतात काही स्थावर मालमत्ता आहेत. यातील काही स्थावर मालमत्ता या भाडे करारावर देण्यात आल्या आहेत. त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते.
रेखा मुंबईतील बँडस्टँड परिसरात राहते. जवळच एका बाजूला शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला आहे आणि दुसऱ्या बाजूला सलमानचा गॅलेक्सी अपार्टमेंट आहे. रेखाच्या बंगल्याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये असून त्याचे नाव 'बसेरा' आहे.
रेखा ब्रँड एंडोर्समेंटमधूनही चांगली कमाई करते. ती वेळोवेळी काही टीव्ही सीरियल्सचे प्रमोशन आणि जाहिराती करते. ज्यासाठी तिला प्रचंड मानधन मिळते. रिपोर्ट्सनुसार, होर्डिंगवर तिचे चित्र वापरले तर रेखाला त्यासाठी 10-20 लाख रुपये मिळतात.
'मसाला डॉट कॉम'च्या वृत्तानुसार रेखाने बँकेत काही मुदत ठेवी (Fixed Deposite) आहेत. करिअरच्या शिखरावर असताना तिने विनाकारण खर्च केला नाही. त्याऐवजी तिने या पैशांची बचत केली. आपल्या कमाईतील बहुतांश रक्कम बँकेच्या ठेवींमध्ये गुंतवली.
रेखा कधीही लेटेस्ट डिझायनर कपडे घालत नाही किंवा कपड्यांवर पैसे खर्च करत नाही. खरं तर, ज्या वेगवेगळ्या सिल्कच्या साड्यांमध्ये रेखा दिसते. मात्र, या साड्या त्यांना बहुतेक भेटवस्तू म्हणून मिळाल्या आहेत. त्यांची किंमत लाखात आहे.
रेखा आपल्यासोबत स्वत:ची मोठी टीमही ठेवत नाही. यामुळे तिचा मोठा खर्च वाचतो. रेखासोबत मागील अनेक दशकांपासून एक स्वीय सचिव आणि एक कार चालक आहे.
रेखा ही राज्यसभेची खासदार होती. खासदार आणि त्यानंतर माजी खासदार म्हणून असलेले वेतन, भत्ते रेखाला मिळतात. त्याशिवाय इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी रेखा मानधन आकारते.