Tabu : एक्स बॉयफ्रेंडवर तब्बू आजही करतेय मनापासून प्रेम? या गोष्टीमुळे चर्चांना उधाण
तब्बू सध्या तिच्या औरों में कहां दम था या सिनेमामुळे बरीच चर्चेत आली आहे. या सिनेमात ती अजय देवगनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण याच दरम्यान अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका गोष्टीमुळे बरीच चर्चेत आली आहे. यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.
हे सगळ्यांनाच माहित आहे की, दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनवर तब्बूचं खूप प्रेम होतं. दोघेही जवळपास 15 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण अचानक त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या.
तब्बू आणि नागार्जुनचे नाते तुटण्याचे कारण अभिनेत्याचे पहिले लग्न होते, असे म्हटले जाते. खरंतर, जेव्हा या जोडप्यात प्रेम फुलले तेव्हा नागार्जुन आधीच विवाहित होता. त्यामुळे वर्षानुवर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तब्बू अभिनेत्यापासून वेगळी झाली.
पण प्रेम लपवता येत नाही असं म्हणतात. आता नुकतेच तब्बूने नागार्जुनसाठी असे काही केले आहे, जे पाहून त्याचे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.
खरंतर, अलीकडेच फादर्स डेच्या निमित्ताने साऊथ अभिनेता नागा चैतन्यने त्याचे वडील नागार्जुनसोबतचा एक जुना फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. हे पाहून तब्बू स्वत:ला रोखू शकली नाही आणि तिने फोटोच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक हार्ट इमोजी पाठवले.
आता तब्बूच्या या प्रतिक्रियेने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. आजही तब्बू तिचे प्रेम विसरू शकली नसल्याचे यूजर्सचे म्हणणे आहे.
नागार्जुन आणि तब्बूने नाईन पेल्लादाठा आणि अविदा मां अविदा या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.