Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडने थेट मंचावर केलं होतं प्रपोज; कोण आहे पलाश मुच्छल?, सोशल मीडियावर रंगली चर्चा
कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय महिला संघाने बुधवारी दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा चार धावांनी निसटता पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपकर्णधार स्मृती मानधनाने 103 चेंडूत शतक झळकावले. हे तिचे वनडे कारकिर्दीतील 7वे शतक आहे. मागच्या सामन्यातही मानधनाने 127 चेंडूंत 117 धावांची शानदार खेळी केली होती.
सलग दोन वनडे शतके झळकावणारी मानधना ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिने माजी कर्णधार मिताली राजची बरोबरी केली आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना गेल्या आठवडाभरापासून चर्चेत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बेंगळुरू येथे सुरू असलेल्या द्विपक्षीय मालिकेत त्याने सलग दोन शतके झळकावली.
स्मृती मानधना हिचा जन्म 18 जुलै 1996 रोजी झाला होता. ती भारतीय महिला क्रिकेट संघाची एक प्रसिद्ध खेळाडू आहे आणि महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळते.
स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. दोघांचे फोटो समोर येताच व्हायरल होतात. स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडचे नाव पलाश मुच्छल आहे.
मध्य प्रदेशातील इंदूर येथे राहणारा पलाश मुच्छल हा एक गायक असून तो बॉलिवूड चित्रपट आणि जाहिरातींसाठी गातो. दोघांची मैत्री खूप जुनी आहे. एकदा पलाश स्मृतीला तिच्या 27 व्या वाढदिवसाला सरप्राईज देण्यासाठी ढाकाला गेला होता.
पलाशने नुकतेच लाइव्ह कॉन्सर्टमध्ये खचाखच भरलेल्या मंचासमोर स्मृतीवरील प्रेम व्यक्त केले. पलाश मुच्छल यांनी स्मृती यांचा प्रस्ताव स्वीकारला आणि ‘आय लव्ह यू स्मृती’ असे सांगितले.
स्मृती यांनी सोशल मीडियावर पलाशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने इंटरनेटवर खळबळ उडाली.
मानधनाने दोघांचा एक गोंडस फोटो पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ''हॅपी बर्थडे बॉय, पुढचे वर्ष खूप छान जावो...''