Sonam Kapoor Pics: बॅकलेस ब्लाउज अन् ब्राउन साडी; सोनम कपूरची अदाच लय भारी!
सोनम कपूर बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या अभिनेत्री तिचा मुलगा आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवत आहे. दरम्यान, अभिनेत्रीनं तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत.
सोनम कपूर तिची खास मैत्रिण आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिच्यासाठी एक अप्रतिम बेबी शॉवर पार्टी आयोजित केली होती.
या फंक्शनमध्ये सोनम कूपरचा अतिशय स्टायलिश लूक पाहायला मिळाला. अभिनेत्रीनं तपकिरी रंगाची साडी वेअर केली होती.
सोनमनं ही साडी डिझायनर ब्लाउजसोबत परिधान केली होती. जे क्रोसिएनं बनवलं होतं.
अभिनेत्रीचा हा ब्लाउज फक्त मागच्या बाजूला नॉट्सनी बनवला होता. अभिनेत्रीनं तिच्या ब्लाउजशी जुळणारे दागिने घालून तिचा लूक पूर्ण केलेला.
या ब्लाउजसोबत अभिनेत्रीनं तपकिरी रंगाची प्लेन सिल्क साडी नेसली होती. ज्यावर पांढऱ्या रंगाची पातळ लेस बॉर्डर होती.
सोनमचा सटल मेकअप, हेअर बन आणि युनिक कानातले तिच्या लुकमध्ये भर घालत होते.
अभिनेत्रीचे हे फोटो पाहून चाहते खूपच खूश झाले असून कमेंट्सचा वर्षाव करत होते.
हे फोटो शेअर करताना सोनमनं लिहिलं की, प्रत्येक गोष्ट प्रेमानं तयार केली होती. ज्याची शैली माझ्या ड्रीम टीमनं केली होती. शेवटच्या चित्रात, अभिनेत्री मसाबाच्या बेबी बंपवर हात ठेवून हसताना दिसली.