Shreya Ghoshal Net worth : एका गाण्यासाठी किती मानधन घेते बॉलीवूडची मेलोडी क्विन? जाणून घ्या श्रेया घोषालच्या संपत्तीविषयी
आपल्या सुमधूर गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी गायिका म्हणून श्रेयाने नावलौकिक मिळवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिच्या सुरेल गाण्याचे लाखो चाहते आहेत. बॉलीवूडसह मराठी, बंगाली तेलुगू सिनेसृष्टीतही श्रेयाच्या आवाजाने ओळख निर्माण केली आहे.
श्रेयाचा जन्म पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे 1984 साली झाला.
श्रेया ही तिच्या लाईव्ह शो आणि चित्रपटांमधून कमाई करते.
न्यूज18 च्या अहवालानुसार, श्रेया ही प्रत्येक गाण्यासाठी 25 लाख रुपये मानधन घेते.
त्याचप्रमाणे दरमहा तिचं उत्पन्न हे जवळपास एक कोटी रुपयांच्या आसपास आहे.
एवढचं नाही तर श्रेया घोषालकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. तिच्याकडे मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू या आलिशान गाड्या आहेत. या गाड्यांची किंमत कोटींमध्ये आहेत.
श्रेयाची एकूण संपत्ती ही 180-185 कोटी रुपये आहे.
श्रेयाने आतापर्यंत एक हजाराहून अधिक बॉलीवूड गाणी गायली आहेत.