Pathaan : आठ देशांमध्ये झालंय शाहरुखच्या 'पठाण'चं शूटिंग
यशराजच्या बॅनरखाली 'पठाण'ची निर्मिती करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'पठाण' सिनेमाच्या शूटिंगसाठीदेखील त्यांनी खूप अभ्यास केला आहे आणि वेगवेगळ्या जागांची निवड केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आठ देशांमध्ये 'पठाण' सिनेमाचं शूटिंग झालं आहे.
पठाण सिनेमाचं शूटिंग स्पेन, यूएई, भारत, तुर्की, फ्रान्स या प्रमुख देशांमध्ये झालं आहे.
'पठाण' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे.
रिलीजच्या सात दिवसांत पठाणने जगभरात 600 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
भारतीय सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या सिनेमाने भारतात 328 कोटींची कमाई केली आहे.
'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे.
'पठाण' सिनेमाची निर्मिती 250 कोटींमध्ये करण्यात आली आहे.
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'पठाण' हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.