Happy Birthday Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या वाढदिवसाची धुमधडाक्यात सुरुवात! मन्नतबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; पाहा फोटो
शाहरुखसाठी यंदाचा वाढदिवस खूपच खास असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाहरुख आज आपला 58 वा वाढदिवस (Shah Rukh Khan Birthday) साजरा करत आहे.
किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी त्याच्या मन्नत (Mannat) बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली होती.
अभिनेत्याने (SRK) या सर्व चाहत्यांचे आभार मानले.
मन्नतबाहेर शाहरुखच्या चाहत्यांनी जास्त गर्दी केल्याने पोलिसांना नियंत्रण मिळवण्यासाठी लाठी चार्ज करावा लागला.
एसआरके (SRK) अर्थात शाहरुख खान हा फक्त बॉलिवूड अभिनेता नसून जगभरात त्याचा बोलबाला आहे.
मन्नत बंगल्याच्या गॅलरीमधले शाहरुखचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शाहरुखचा 'डंकी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेहमीप्रमाणे यंदाही चाहत्यांनी मन्नतबाहेर मोठी गर्दी केली होती.