PHOTO : 'कहीं तो होगा' मालिकेतील आमना शरीफ आता कशी दिसते?
टीव्ही सीरियल 'कहीं तो होगा'मध्ये कशिशची भूमिका करून घराघरात नाव पोहोचलेली सुंदर अभिनेत्री आमना शरीफ पुन्हा एकदा इंडस्ट्रीत सक्रिय झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमना सध्या तिच्या 'अधा इश्क' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. तिची रोमाची व्यक्तिरेखा लोकांच्या पसंतीस उतरली आहे.
आमनाने 'अधा इश्क'मध्ये पहिल्यांदाच ऑनस्क्रीन किसिंग सीनही केला आहे. यावरून तिचे निर्माते आणि दिग्दर्शकासोबत वादही झाले.
आमनाने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे.
आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता ती पुन्हा सक्रिय झालीय.
आमना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. आता तिचा लूक बदलला आहे.
आमनाचे लेटेस्ट फोटो पाहून तिचे चाहते खूप खूश झाले आहेत. आमनाबद्दलचे त्यांचे प्रेम अजूनही कायम आहे.
आमना अजूनही सर्व प्रकारच्या पोशाखांमध्ये अप्रतिम दिसते. शॉर्ट ड्रेस असो की साडी, सगळ्यात ती सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.