PHOTO : मनीष मल्होत्राच्या डिझायनर साडीत खुललं साराचं रूप! फोटोवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा!
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने 2018मध्ये 'केदारनाथ' या चित्रपटाद्वारे तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तेव्हापासून ती सर्वांची लाडकी बनली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतेच सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत साराने निळ्या रंगाची नेट साडी परिधान केली आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. ही साडी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझान केली आहे.
साराच्या लुकचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे तिचा ब्लाऊज. गळ्यात फर वर्क असलेल्या हॉल्टर नेक स्टाईल ब्लाऊजसह तिने ही साडी परिधान केली आहे.
सारा अली खान या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्याच वेळी, चाहतेही साराच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्रीने मॅचिंग आय शॅडो, भडक लिपस्टिक आणि सुंदर हेअरस्टाईलसह तिचा लूक पूर्ण केला.
अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे 40.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, साराने नुकतेच विक्रांत मेस्सीसोबत 'गॅसलाईट' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याआधी साराने विकी कौशलसोबत एका चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. (Photo : @ saraalikhan95/IG)