Happy Birthday: संगीता बिजलानी अजूनही सलमानबरोबरचं नातं सांभाळतेय; म्हणाली..
त्रिदेव, हातिमताई, कातिल आणि जूर्म या चित्रपटात काम करणारी संगीता बिजलानी यांचा आज वाढदिवस आहे. संगीता बर्याच कारणांमुळे चर्चेत असते. (photo courtesy : @sangeetabijlani9 instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री संगीता बिजलानी आणि सलमान खान यांचे नातं आणि ब्रेकअप कुणापासून लपलेले नाही. एकेकाळी दोघांच्या लग्नाची कार्डेही छापली गेली. पण, त्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता सलमान आणि संगीता बिजलानी चांगले मित्र आहेत.(photo courtesy : @sangeetabijlani9 instagram)
आपल्या सर्वांना माहित आहे की, संगीताचे तिचा पूर्वाश्रमीचा जोडीदार सलमान खान आणि त्याच्या कुटुंबासोबत चांगले संबंध आहेत. सलमान खानच्या अनेक पार्ट्यांमध्ये ती बर्याचदा बघायला मिळते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संगीताने सांगितले आहे की, तिने सलमान खानसोबतचे नाते चांगलं सांभाळलं आहे.(photo courtesy : @sangeetabijlani9 instagram)
संगीता म्हणाली, कनेक्शन कधी तुटत नाही किंवा दूरही जात नाही. आपला जोडीदार, शाळेतील मित्रांमधील प्रेम कधीही कमी होत नाही. लोक येतील आणि जातील. जीवनात कोणीही कायम नाही. याचा अर्थ असा नाही की आपण कोणावर राग किंवा बदला घ्यावा.(photo courtesy : @sangeetabijlani9 instagram)
एक वेळ येते जेव्हा आपण या गोष्टींवर विजय मिळवता. संगीता म्हणाली, माझ्या आयुष्यातही एक वेळ होती जेव्हा मी बालिश आणि मूर्ख होते. मात्र, आता मी मॅच्युअर झाली आहे. आयुष्य अनुभवाने भरलेले असते. सलमानसोबतच्या लग्नाविषयी संगीता म्हणाली, की एक काळ असा होता की जेव्हा मला खरोखर लग्न करायचे होते. मात्र, नंतर गोष्टी जुळल्या नाही.(photo courtesy : @sangeetabijlani9 instagram)
माजी क्रिकेटपटू अझरुद्दीनशी लग्नानंतर संगीता बिजलानी पडद्यावरुन गायब झाल्या. अझरुद्दीनशी ब्रेकअप करुनही ती चित्रपटांत दिसली नाही. आता ती पुनरागमन करणार आहे. संगीता वेब सीरीजद्वारे कमबॅक करण्याच्या विचारात आहे.(photo courtesy : @sangeetabijlani9 instagram)
त्यांनी सांगितले की बऱ्या ऑफर आल्या. मात्र, माझ्या संवेदनशीलतेनुसार त्यामध्ये माझी कोणतीही भूमिका नाही. माझ्याकडे वेब सीरिजचा प्रस्ताव देखील आहे. जर हे मला आवडलं तर मी यात काम करेल. मला काहीतरी वेगळं आणि मनोरंजक करायचं आहे. मला नियमित भूमिका करायला आवडत नाही.(photo courtesy : @sangeetabijlani9 instagram)