Celebrity Couple : आईनेच दिला होता लिव्ह इनमध्ये राहण्याचा सल्ला, आता 10 वर्षांनी लग्न करणार 'हे' सेलिब्रिटी कपल?
नुकतच त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावर बोलताना सनमने म्हटलं की, आम्ही दोघे गेल्या 10 वर्षांपासून एकत्र राहत आहोत.
पुढे त्यानं म्हटलं की, अबिगेल माझी आधी चांगली मैत्रीण आहे. आजही आम्ही दोघे कुठे गेलो तर 3-4 तासांनी आम्हाला एकमेकांची आठवण येऊ लागते.
यावर अबिगेलने म्हटलं की, मला असं वाटतं की आमच्या दोघांची एक खूप चांगली टीम आहे. आम्ही दोघं एकमेकांचं आयुष्य बॅलन्स्ड करण्याचा प्रयत्न करतो.
दरम्यान सनमच्या आईने दोघांना लिव्ह इनमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता, असा खुलासा देखील यावेळी सनमने केला आहे.
यावेळी त्या दोघांनी लग्नाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं आहे.
यावर बोलताना अबिगेलनं म्हटलं की, हो नक्कीच आम्ही लवकरच लग्न करणार आहोत, आमची पुढची स्टेप तिच आहे.
पुढे तिनं म्हटलं की, पण आता आम्ही दोघं लग्न न करता एकत्रच राहत आहोत, मग लग्नाची गरज काय.
तसेच यावेळी त्यांनी एकमेकांच्या नात्याविषयीच्या अनेक रंजक गोष्टी देखील सांगितल्या.